भिजलेले डोळे…

•मार्च 11, 2010 • १ प्रतिक्रिया

भिजलेल्या डोळ्यांना बोलायची गरजच काय?
आठवणींना तुझ्या विसरायची गरजच काय?
डोळे भिजतील, आठवणींना ऊत येइल,
या अश्रुंना, आठवणींना थोपवायची गरजच काय?

तु होतास तेव्हा हेच डोळे आनंदाने फुलायचे,
मन तुझ्या असण्याने हिंदोळ्यावर झुलायचे,
आकाशाकडे पाहुन स्वप्नांमध्ये पळायचे.
तुझ्या स्पर्शाने मग तन अन् मन जळायचे.

तु असला की दिवस दिवस वाटायचा
रात्री मग त्याच दिवसाचा पाढा उजळायचा
प्रत्येक क्षण अशीच आठवण मिळवायचा
अन् मनातल्या तुझ्य कप्प्यात जाऊन मिसळायचा

तु गेलास अन् दिवसाचा काळोख झाला
रात्रीचा, झोपेचा पत्ताच नाहीसा झाला
क्षण क्षण वाटु लागला टोचणारा भाला
मनातला तुझा कप्पाही मग भकास झाला

डोळे आता असतात भिजलेले
मन असते आठवणींत गुरफटलेले
तुझा आभास प्रत्येक क्षणांतला
करतो माझे जग विस्कटलेले
-विकास

ती एक चन्द्र

•ऑगस्ट 12, 2008 • प्रतिक्रिया नोंदवा

ती चन्द्र बनुन उगाच माझ्या मन:सागराला आठवणीँची भरती आणत असते अणि विशेष म्हणजे माझ्या या चंद्राला कलाच नाहीयेत फक्त पोर्णिमाच ती काय आहे, अणि त्यामुळेच का काय आठवणीँना ओहोटीच लागत नाही. भुतकाळातील क्षण लहर बनुन मनाच्या किनारयावरची वाळु अलगद ओली करून जातात, तो ओलावा खरच इतकाही सह्य नसतो पण का कुणास ठाउक मनाला तो गारवा सारखा हवाहवासा वाटतो. पण चन्द्र उगवला की मात्र तीच लहर लाट कधी बनते तेच कळत नाही आणि तो हवाहवासा गारवा, ओलावा देणारा क्षणांचा स्पर्श एकाएकी असह्य मारामध्ये कधी बदलतो हे मनामधे उलथापालथ झाल्यावर सुद्धा समझत नाही कारन मन गुंतलेल असत चन्द्र पाहण्यात पण ते नेमक हेच विसरत की तो चन्द्र आपल्यापासून किती दूर आहे. पण तरीही ते एकच विचार करत असाव की दूर असला तरीही आम्ही परस्परांशी कशाने तरी जोडलेलो आहोत आणि दोघांनाही एकमेकांची ओढ़ आहे. आणि याच ओढीला प्रेम म्हणत नसतील???
—————————————————-अजुन बाकि
– विकी

आता कुठे मी….

•मे 3, 2008 • 2 प्रतिक्रिया

आता कुठे मी….
आता कुठे मी स्वप्न पहायला शिकतोय
रात्रीच्या कुशीत शांत झोपायला शिकतोय
विचारांना आता कुठे गति आलीय माझ्या  
दिवसांना आता कुठे सार्थकी लावायला शिकतोय

सागळ जग बदलतय माझ आता अन् 
मी ही माझ्यात बदल करायला शिकतोय
सोप्प नव्हत कधी हे आणि नसनारेयही
पण अवघड गोष्टिच करायला शिकतोय  

क्षितिज बरच लांब आहे अजुन पण
दरमजल करत निदान चालायला शिकतोय
सुर्याला तोंड देऊ शकत नाही अजुन पण
काजव्याला तरी मुठीत पकडायला शिकतोय

यशापयश काय असत हे माहित नाही मला
पण उमेदीन लढायला मात्र शिकतोय
जिंकायाची अपेक्षा केलीच नव्हती कधी
पण जीवनात हरायच नाही कधी हे शिकतोय

अजुन तरी स्वतंत्र विचार केला नव्हता कधी
आता स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायला शिकतोय
सर्व काही अंधारातच आहे अजुन पण
आत्मविश्वासाच्या ज्योतिने अंधार भेदायला शिकतोय
-विकी-    

दुष्काळ प्रेमाचा…

•मे 1, 2008 • 2 प्रतिक्रिया

दुष्काळ प्रेमाचा…
देवा आतातरी या देशात पाउस पाड
सुकून चाललय इथल झाड न झाड
नव्या फुटणाऱ्या पालाविच तरी काय
का ती ही अशीच सुकून जाणारय काय?
नसत वाटल काहीच जर असता सगळीकड़ेच दुष्काळ
पण दुरदेशी पडणाऱ्या सरिवरसरी लावतात मनाला दुःखाचा फाळ
का वागतोस असा माझ्याशी का करतोस दुजाभाव
दरवेळेस तुझे ढग माझ्या घरावरून करतात घुमजाव
बस! पूरे झाल आता थकलो मी आता आज
किती दुर्दैवी मी की चातकालाही वाटते माझी लाज
पण काही केलतरी वाट पाहन सोडवत नाही
कारन माश्याला पान्याशी वैर करून चालत नाही.
-विकी

माझ्यासाठी….

•एप्रिल 27, 2008 • प्रतिक्रिया नोंदवा

कस्तूरी

•एप्रिल 15, 2008 • 2 प्रतिक्रिया

-कस्तूरी-
अंधारच अंधार सगळीकड़े
बरीच वाट पाहिली पण
जीवनात सकाळ कधी झालीच नाही
उरतो फक्त मी अन मीच
चंद्र, चांदन्या असूनही
त्यांची सोबत कधी झालीच नाही

अशक्यतेचा वाळवंट तुडवतना
बरीच वाट पाहिली पण
शक्यतेची सर कधी आलीच नाही
चालतो तरीही वाट दिशाहिन्
पाउलखून ही कोणाची
मदतीला कधी आलीच नाही

मनाला दुःखाचे डोहाळे पुरवताना
बरीच वाट पाहिली पण
सुखाची भावना कधी व्यालीच नाही
जपतो तरीही मनाला
का उगाच कळत नाही
डोहाळ्याची रित कधी मोड़लीच नाही

जगतो आहे मरण माझे
बरीच वाट पाहिली पण
नवसंजीवनी कधी मीळालीच नाही
तीच होती एक संजीवनी
पण सुगंध घेनाऱ्या मृगाला
कस्तूरी कधी मीळालीच नाही
  -विकी

प्रेमाच नाव देऊ नकोस

•मार्च 31, 2008 • 5 प्रतिक्रिया

प्रेमाच नाव देऊ नकोस


समाजाच्या भितीपायी प्रेमात मझ्या पडू नकोस
येईल माझी आठवण तर मात्र रडू नकोस

असुन मैत्रीणीँच्या गराड्यात एकटी मात्र राहू नकोस
असतील वाटेवर डोळे पण वाट माझी पाहू नकोस

पडेल माझे स्वप्न म्हणुन रात्री तु झोपु नकोस
निघताच माझे नाव डोळ्यातले भाव मात्र लपवु नकोस

शेवटी रहा अशीच एकटी अन् सुख मलाही देऊ नकोस
पुढे होशील कधीतरी कोणाची त्याला प्रेमाच नाव देऊ नकोस !!

–विकी

विरही रात्र

•मार्च 31, 2008 • 3 प्रतिक्रिया

विरही रात्र

मावळला सुर्य न संधीप्रकाश जीवनी उरला !
बोचऱ्‍या आठवणीँचा सुगंध आसमंती दरवळला !!
लाल क्षितिजावरती पक्षांची दीसे आडवी रांग !
मन पोहचते शुन्यात अन विचारांत अथांग !!
अंधाराचा विळखा जगाबरोबरच माझ्या मनाला !
ह्रदयाचे हुंदके मग वाढती क्षणाक्षणाला !!
चंद्राच हळुच डोकावण रात्रीला जरी करते शांत !
पण माझ मन पुरत बुडत आठवणीत नखशिखांत !!
चांदण्यांनाही माझी दशा मग बघवत नाही !
माझ्या इच्छेसाठी पडल्याशिवाय त्यांनाही राहवत नाही !!
रात्र अशीच माझ्यासह पहाटेकडे झुकते !
माझा विरह पाहुन पहाटेलाही मग रडु फुटते !!
उभी रात्र अन पहाटही माझ्यासह अश्रुंनी थिजते !
उगाच का मग अवघी धरा दवाने भिजते !!
अखेर या सर्वाँची सुर्याला मग दया येते !
उगवत्या सुर्याचे किरण दवाश्रुंचा पसारा पुसते !!
असाच रोज असतो मी रात्री हतबल !
असतो सदा दुःखी अन असते मनी चलबिचल !!
–विकी

चेहरा तिचा पहायला

•मार्च 31, 2008 • प्रतिक्रिया नोंदवा

चेहरा तिचा पहायला

स्वप्नालाही स्वप्न पडावे
रात्रीने दीवसासाठी रडावे
चेहरा तिचा पहायला

चेहरा तिचा पहायला

चंद्रालाही मोह पडावा
सुर्याचाही जीव जळावा
चेहरा तिचा पहायला
चेहरा तिचा पहायला

आरसा लाजवी चातकाला
असतो इतका तहानलेला
चेहरा तिचा पहायला
चेहरा तिचा पहायला

ह्रदयाचा ठोकाही चुकतो
घड्याळाचा काटा थांबतो
चेहरा तिचा पहायला
चेहरा तिचा पहायला

हर वक्त असतो तिचाच नुर
दिवस रात्र असतो आतुर
चेहरा तिचा पहायला
चेहरा तिचा पहायला
–विकी

प्रश्न – तिचे की माझे

•मार्च 31, 2008 • १ प्रतिक्रिया

प्रश्न – तिचे की माझे

जीवनात माझ्या रंग होतेच कधी मग
बेरंग चित्रातले रंग उडविलेसच कसे तु?
प्रश्न विचारलाच नव्हता तुला कधी मग
‘तुझी नाहीच मी’ अस उत्तर दिलेसच कसे तु?
दिवसा चैन अन् रात्री झोप दिली नाहीस कधी मग
तु ज्यात असुनही माझी नसणारे स्वप्न दिलेसच कसे तु?
सुरूवात तुझ्यापासुन केलीच नव्हती कधी मग
प्रत्येक विचार तुझ्यापर्यँत येऊन थांबावा असे केलेसेच कसे तु?
एक शब्दसुद्था नीट रचता येत नव्हता कधी मग
कविता लिहीण्याजोग मन कल्पक बनविलेस कसे तु?
प्रश्न हे इथेच संपत नाहीत उलट वाढतच जातील
उत्तरे तुला देताच येणार नाहीत उलट तुझेच प्रश्न बनुन राहतील…

–विकी

 
Follow

Get every new post delivered to your Inbox.