दुष्काळ प्रेमाचा…

दुष्काळ प्रेमाचा…
देवा आतातरी या देशात पाउस पाड
सुकून चाललय इथल झाड न झाड
नव्या फुटणाऱ्या पालाविच तरी काय
का ती ही अशीच सुकून जाणारय काय?
नसत वाटल काहीच जर असता सगळीकड़ेच दुष्काळ
पण दुरदेशी पडणाऱ्या सरिवरसरी लावतात मनाला दुःखाचा फाळ
का वागतोस असा माझ्याशी का करतोस दुजाभाव
दरवेळेस तुझे ढग माझ्या घरावरून करतात घुमजाव
बस! पूरे झाल आता थकलो मी आता आज
किती दुर्दैवी मी की चातकालाही वाटते माझी लाज
पण काही केलतरी वाट पाहन सोडवत नाही
कारन माश्याला पान्याशी वैर करून चालत नाही.
-विकी

~ by vickyjagtap on मे 1, 2008.

2 प्रतिसाद to “दुष्काळ प्रेमाचा…”

  1. hi

  2. नमस्कार,
    कविता सुंदरच आहे.
    “का वागतोस असा माझ्याशी
    का करतोस दुजाभाव”
    किती सुंदर आरोप आहे पावसावर…बिचारा पाऊस!
    “पावसांन भिजवलां आणि घोवांन-नवऱ्याने- मारलां तर कोणांक जावून सांगू?”
    असं पण म्हणणारी आहे कुणीतरी, कोकणात
    कोकणातल्या पावसाला किती टाकून बोलतात हे आपल्या सुंदर कवितेतून मला एक लेख लिहायला सुचला
    “इलो रे इलो! पाऊस इलो!”
    लवकरच माझ्या “कृष्ण उवाच” वर वाचावा ही विनंती
    सामंत

तुमचा अभिप्राय नोंदवा